प्रकल्प
- ग्रामीण विकास केंद्र
- लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय (इ. ५ वी ते १० वी)
- डॉ. ग. दा. सप्तर्षी कनिष्ठ महाविद्यालय
- राष्ट्रपिता महात्मा गांधी कला महाविद्यालय
- सुविधा : उत्तम ग्रंथालय, खेळाची मैदाने
- मत्स्य शेती
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या "खेड्याकडे चला" या संदेशाचे व्यवहारात उतरलेले स्वप्न म्हणजे "भारतीय समाज विकास व संशोधन संस्था" .
रचनात्मक कार्यातून ग्रामीण भागामध्ये जागृती निर्माण करायची व परिवर्तन घडवायचे हा संस्थेचा मुख्य उद्देश्य होता. यासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या एका टोकाला भीमा नदीच्या काठी बसलेल्या खेड गावाची निवड करण्यात आली. या गावात सुरुवातीला ग्रामीण जनतेला भूकमुक्त करण्यासाठी व ग्रामीण विकासासाठी प्रयोग करण्यात आले. त्यानंतर शिक्षण हा परिवर्तनाचा प्रारंभबिंदू मानून विद्यालय चालू करण्यात आले. यातून पुढे विविध संस्थांचा विस्तार झाला.
संकल्प
- संपूर्ण क्रांती अकादमी
- शेती विद्यालय
- ग्रामीण तरुणांसाठी वर्षभर शिबिरे